धुळे । येथील पोलीस मुख्यालयात राहणारे हवालदार मृतावस्थेत आढळून आले असून त्यांच्या मामाने पोलिसात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. येथील पोलीस मुख्यालय बिल्डींग नं.14 च्या रुम नं.1 मध्ये 42 वर्षीय पोकॉ दीपक साहेबराव महाले राहत होते. त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालयातच असून सध्या ते रजेवर होते. दि.23 रोजी सकाळी 6 वाजता ते घरात बेशुध्द अवस्थेत आढळून आल्याने त्यांच्या नातलगांनी देवपूरात राहणार्या संजय सुर्यवंशी यांना कळविले. सुर्यवंशी यांनी तत्काळ मुख्यालयात येवून दीपक महाले यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी महाले यांना मृत घोषित केले. याबाबत मयत दीपक महालेंचे मामा संजय सुर्यवंशी यांनी शहर पोलिसात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद झाली.