पोलीस मुख्यालयात अधिक्षकांच्या हस्ते वृक्षरोपण

0

धुळे । राज्य शासनाच्या वतीने राज्यात 1 ते 7 जुलै दरम्यान 4 कोटी वृक्ष लागवड अभियानाअंतर्गत धुळे पोलीस दलातर्फे वृक्षरोपणाचा प्रारंभ पोलीस अधिक्षक कार्यालयात करण्यात आला. याप्रसंगी पोलीस अधिक्षक एम. रामकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव, प्रभारी पोलीस उपअधिक्षक गवळी, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक परदेशी तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी 1700 वृक्षांचे पोलीस दलातर्फे वृक्षरोपण करण्यात येणार आहे.