पोलीस वर्धापनदिनानिमित्त विद्यार्थ्यांची भेट

0

जळगाव : महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनानिमित्त गुरूवारी शनिपेठ पोलीस स्टेशनला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात पोलीस अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या कामकाजाविषयी तसेच विविध शस्त्रांविषयी माहिती दिली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थींनी उपस्थित होत्या. शनिपेठ पोलीस ठाण्यात आज गुरूवारी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी हद्दीतील के.के.उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थींनी व मुख्याध्यापकांनी पोलीस स्टशेनला भेट देवून कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

शनिपेठचे पोलीस निरीक्षक प्रधान यांचे मार्गदर्शन
कार्यक्रमात पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांनी विविध शस्त्रांची माहिती दिली. एपीआय सचिन बेंद्रे, पोकॉ. विजय सोनार, पोकॉ. संदीप माने यांनी विद्यार्थींनींना पोलीस स्टेशनला रोज चालणार्‍या कामकाजाविषयी माहिती दिली. विद्यार्थीनींनी वेगवेगळ्या प्रकारे प्रश्‍न विचारून कामकाजाची माहिती जाणून घेतली.