भुसावळ । वनसप्ताहानिमित्त भुसावळच्या पोलीस कर्मचारी वसाहतीत भुसावळच्या तहसिलदार मिनाक्षी राठोड यांनी वृक्षारोपण केले. तसेच प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर, नगराध्यक्ष रमण भोळे, सहाय्यक पोलीस अधिक्षक निलोत्पल, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत मोरे यांच्या हस्ते संपूर्ण परिसरात एकूण 200 वृक्षांची रोपे लावण्यात आली. प्रसंगी शालेय विद्यार्थी उपस्थित होते.