मुंबई: दादर येथे असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये तिसऱ्या मजल्यावरच्या घराला आग लागून त्यात एका पंधरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. श्रावणी चव्हाण असे मृत मुलीचे नाव आहे. ही आग दुपारी १.४५च्या सुमारास लागली होती. ही आग सिलिंडरच्या स्फोटामुळे लागली होती. आगीत तीन घरांचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठीअग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या, आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
आग लागली त्या वेळी श्रावणी चव्हाण घरात एकटी होती, तिच्या घरातले सदस्य बाहेरून कुलूप लाऊन लग्न सोहळ्यास गेले होते. या लागलेल्या आगीचा अधिक तपास सुरु आहे.