पोलीस वसाहतीसाठी प्राधिकरणाने भूखंड आरक्षित करावा : गजानन चिंचवडे

0

पिंपरी चिंचवड : शहरामध्ये 15 ऑगस्टपासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले आहे. पिंपरी चिंचवड शहर, मावळ, मुळशी, खेड तालुक्यांची हद्द नवीन पोलीस आयुक्तालयात समाविष्ट करण्यात आली आहे. या आयुक्तालयात जवळपास हजार पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वसाहती उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीष बापट, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी भूखंड आरक्षित करावा, अशी मागणी पोलीस फेंन्डस वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवड यांनी खाडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या परिसरातील कायदा, सुव्यवस्था उत्तम रहावी , यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी पिंपरी चिंचवड शहरात घरकुलसारखी योजना राबविणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड प्राधिकरणाकडे अद्यापही अनेक भूखंड शिल्लक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.