पुणे : महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेने पोलीस भरती प्रक्रियेतील नवीन बदलाला विरोध केला असून तो रद्द करण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी केली आहे. या बाबतीत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.
पोलिसांची नोकरी खडतर असून १२ ते १४ तास उन, पावसात ड्युटी करावी लागते, यासाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्वाची आहे. नवीन बदलाप्रमाणे पहिल्यांदा लेखी परीक्षा १०० गुणांची असून त्यानंतर ५० गुणांची शारीरिक क्षमतेची चाचणी होणार आहे. त्यामुळे लेखी परीक्षेला महत्व प्राप्त झाले असून शारीरिक क्षमता दुय्यम होणार आहे. वर्षानुवर्ष मैदानावर शारीरिक तंदुरुस्तीसाठी मेहनत घेणाऱ्या उमेदवारावर अन्याय होणार आहे, म्हणून पोलीस भरती प्रक्रियेतील नवीन बद्दल रद्द करून पूर्वीप्रमाणे भरती प्रक्रिया करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.