पिंपरी : भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, पुणे पोलीस हॉकी संघाचे खेळाडू सिद्धार्थ अशोक निकाळजे यांचे मंगळवारी सकाळी सव्वादहा वाजता उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांचा 7 नोव्हेंबर रोजी सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकल वरून जात असताना त्यांच्या दुचाकीला स्कूल बसने (एमएच 12 के क्यू 3099) धडक दिली होती. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर रुबी हॉल येथे उपचार सुरु होते. सिद्धार्थ निकाळजे 2010 साली महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले होते.