पोलीस सहकार्‍याकडूनच महिला पोलिसाचा होतोय मानसिक छळ

0

मुंबई । महिला आज कुठेच सुरक्षित नाहीत याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला, ते ही लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून कार्यरत असणार्‍या पोलीस दलातच. यामुळे पोलीस महिलांनी दाद कुठे मागावी असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. पोलीस दल सदैव सतर्क असतो. मात्र, स्वत:वरच्या अन्यायाला वाचा फोडणे पोलीस कर्मचार्‍यांना कठीण जाते. त्यामुळेच आपल्यावर होणार्‍या मानसिक छळाविरुद्ध तक्रार करत महिला पोलीस शिपाई असलेल्या एका महिलेने मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. नायगाव पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्याविरुद्ध महिला पोलिसांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे पोलीस दलात काम करणार्‍या महिला पोलिसांच्या सुरक्षतेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

पोलीस दलातील कडक शिस्तीत अन्याय सहन करणे अशक्य झाल्याने वरिष्ठ आपल्यावर अन्याय करत असून मानसिक छळ करत असल्याची तक्रार एका महिला पोलीस कर्मचारी हिने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पतीसोबतचे खासगी मोबाइल संभाषण मिळवून नायगाव मुख्यालयाचे पोलीस उपआयुक्त मनोज पाटील हे आपले पतींच्या सांगण्यावरून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार त्या महिलेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या तक्रारी अर्जातही तसेच तिने तसेच म्हटले आहे.

अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा
पती सोबतचे मोबाइल संभाषण अवैध मार्गाने मिळवून माझी बदनामी करत असून त्यामुळे माझे अभिव्यक्तिस्वातंत्र्य धोक्यात आले आहे. माझ्या पतीसोबत हातमिळवणी करून पोलीस उपआयुक्त मनोज पाटील हे माझा मानसिक छळ करत आहेत. ते जाणीवपूर्वक गैरसोय करून मला नजरकैदेत ठेवल्यासारखी वागणूक देत असून, त्यामुळे मी माझे जीवन संपवण्याच्या मनःस्थितीत आले असल्याची तक्रार त्या महिला पोलीस शिपायाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.