भुसावळ । शहर पोलीस स्थानकात बेवारस व गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींचा लिलाव गुरुवार 15 रोजी करण्यात येणार असून वाहनाच्या मुळ मालकांनी सकाळी 11 वाजेपर्यंत पोलीस स्थानकात हजर न राहिल्यास पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत मोरे यांनी सांगितले आहे.
लिलावातील वाहनांचा समावेश
यामध्ये काळ्या रंगाची स्प्लेंडर जीजे. एस 5 1270, चेसीस क्रमांक 00के 820 सी0923, हिरोहोंडा एमपी. 10 एमसी 1025, चेसीस क्रमांक 03ए 20 सी10956, हिरोहोंडा एमएच 04 एएफ 8056, बजाज पल्सर एमएच 02 एएम 8585, चेसीस क्रमांक डीएचवायबीएमएफ 48458, दोन तांब्याच्या पट्ट्या, लोखंडी रेडीएटर, 2 मोबाईल यांचाही लिलाव करण्यात येणार आहे. या वाहनांचे उपप्रादेशिक परिवहन मंडळाकडून हॅल्यूवेशन करण्यात आले आहे.
बेवारस वाहनांचे विवरण
यामध्ये एमएच. 15- 4748 काळ्या रंगाची बुलेट, एमएच. 2 एएम 8585 पल्सर चेसीस क्रमांक डीएचव्हीडीएमएफ 48454, एमएच 4 एजी 8056, जीजे एस 8- 1270, हिरोहोंडा स्प्लेंडर, चेसीस क्रमांक ओओके 20सी06923, एमपी. 10 एमसी स्प्लेंडर चेसीस क्रमांक – 03ए20सी10953, एमएच. 19 के. 6235 चेसीस क्रमांक -02420 एफ27353, एमएच. 30 यु. 3515 सुपर स्प्लेंडर, एमएच. 19 एक्यू. 7326 इंडिका कार, एमएच. 19 बीसी 6876 सुझूकी चेसीस क्रमांक एमबी8 एमएफ 4 एचसी एबी 8106518, एमएच. 19 के. 3824 टीव्हीएस मॅक्स चेसीस क्रमांक 1906 एफ 332896, एमएच. 19 एएक्स 1850 रिक्षा या वाहनांचा समावेश असून या वाहनाच्या मुळ मालकांनी आपल्या कागदपत्रांसह शहर पोलीस स्थानकात 15 रोजी 11 वाजेपर्यंत हजर राहण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक वसंत मोरे यांनी दिल्या आहेत.