पोलीस स्थानकाशेजारी रोहित्राने घेतला पेट

0

भुसावळ । येथील बाजारपेठ पोलीस स्टेशन जवळ असलेल्या 315 केव्ही भार असलेल्या रोहित्राने बुधवार 21 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास पेट घेतल्याने पोलीसांसह नागरीकांची तारांबळ उडाली. सुदैवाने शेजारीच असलेल्या विज वितरण कार्यालयातील कर्मचार्‍यांनी विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे यात जीवीत हानी टळली.

विज वितरण कर्मचार्‍यांची सर्तकता
बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळ विजवितरण कंपनीने 315 केव्ही क्षमता असलेले रोहित्र अचानक जळाले. या रोहित्रावरून विठ्ठल मंदिर वार्ड परिसरात वीज पुरवठा करण्यात येतो. आग लागल्यानंतर पोलीस ठाण्यातुन पोलीस कर्मचारी तातडीने येवून रोहित्राजवळ असलेली पोलीसांचे चारचाकी वाहन शिघ्रतेने लांब नेण्यात आले. विजवितरण कंपनीचे कर्मचारी लागलीच घटनास्थळी आल्याने विज पुरवठा खंडीत करण्यात आला. दुरूस्तीसाठी 2 ते 3 तासांचा कालावधी लागणार असल्याचे विज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी सांगितले.