पोलीस हवालदाराला चार हजाराची लाच घेतांना पकडले

0

नंदुरबार : अटक न करण्यासाठी चार हजाराची लाच घेतांना उपनगर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडण्याची कारवाई केली. या कारवाईमुळे पोलीस कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. नंदुरबार तालुक्यातील पापनेर नारायणपूर येथील एका तक्रारदारावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी हवालदार बबन बापू पाटील यांनी सहा हजाराची लाच मागितली. तडजोडीनंतर चार हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारदाराकडून चार हजाराची लाच घेताना पोलीस हवालदाराला नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबध पथकाने रंगेहाथ पकडले.

24 एप्रिल रोजी तोरणमाळ येथील वैद्यकीय अधिकार्‍याला लाच घेताना अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच 25 एप्रिल रोजी पुन्हा एका पोलीस हवालदाराला लाच घेताना पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शिरीष जाधव, पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या पथकाने केली.