जळगाव । जिल्हा परिषदेच्या शाळांना पुरविण्यात येणार्या शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचे असल्याची चौकशीतुन आढळून आले आहे. जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी 2 जूलै रोजी भुसावळ तालुक्यातील मोढाळा, खंडाळा, गोजोरे येथील शाळांमध्ये जाऊन शालेय पोषण धान्यादींची तपासणी केली असता त्यांना किड सदृश्य धान्य आढळून आले होते.
या प्रकरणी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान गुरुवारी 6 रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार असून पालकमंत्र्याच्या उपस्थितीत बैठकीत हा विषय गाजण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद सदस्य हा नियोजन समितीचा सदस्य असल्याने पल्लवी सावकारे यांच्याकडून हा विषय नियोजन समितीच्या बैठकीत चर्चीला जाण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील विविध विषयावर चर्चा केली जाणार आहे.