जळगाव। जिल्ह्यातील शाळांना पुरविण्यात येणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचे असल्याचे तपासणीतुन आढळून आल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून शालेय पोषण आहार प्रकरण प्रकाश झोतात आहे.
निकृष्ट धान्य पुरविण्यात आल्याची तक्रार सीईओं यांच्याकडे केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व शाळांमधील आहार तपासणीस सुरुवात झाली आहे. काही ठिकाणच्या अहवालात पोषण आहार हे शंभर टक्के खाण्या योग्य असल्याचे सांगण्यात आले आहे,
सर्वसाधारण सभा गाजली
तर प्रत्यक्ष शाळेत तपासणी केली असता निकृष्ट धान्य आढळून येत असल्याने संबंधीत पुरवठादाराला देण्यात आलेला ठेका रद्द करण्यात येऊन पोषण आहार घोटाळ्याची चौकशी सीआयडी ( गुन्हे अन्वेषण) विभागामार्फत करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत केली. सीआयडी चौकशीचा ठरात सर्वसाधारण सभेत मंजुर करण्यात आला असून शासनाकडे संबंधीत चौकशीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेची या पंचवार्षीकची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी 14 रोजी पार पडली. या अगोदर नोटाबंदी काळात नोटाबदली प्रकरणी झेडपीतील वरिष्ठ अधिकार्यांची चौकशी झाली होती हे प्रकरण ताजे असतांना पोषण आहाराची चौकशी सीआयडी मार्फत करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पहिल्या सर्वसाधारण सभेत 22 विषय ठेवण्यात मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी दोन-तीन विषयावरुन सभा खूप गाजली. यात 20 विषयांना सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली. एकंदरीत पोषण आहार, सिंचन, पाणीपुरवठा आदी विषयावरुन सभा गाजली.