जुन्नर । शालेय मुलांच्या आहारात पौष्टिक आहार यावा, पौष्टिक अन्न मिळावे म्हणून शाळेत पोषण आहार दिले जाते. परंतु, आहाराचे मुदतबाह्य साहित्य शिक्षण विभागाकडून जप्त करण्यात आले. शाळकरी मुलांच्या पोषण आहारामधील पदार्थ तपासणीबाबतचा प्रश्न उपस्थित होतो. आरोग्याच्या बाबतीत अधिकार्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. शालेय पोषण आहार योजनेचा मुदतबाह्य झालेला सुमारे 31 हजार रुपयांहून अधिक रकमेचा कांदा मसाला व हळद शिक्षण विभागाकडून जप्त करण्यात आला आहे. बचत गटासह ठेकेदारावरही कारवाई करणार असल्याचे गटशिक्षण अधिकारी भुजबळ यांनी सांगितले. शिधावाटप केंद्रात प्लास्टिकचा तांदूळ मिळाल्याचे समोर आले.
144 पाकिटे मुदत बाह्य
गटशिक्षणाधिकारी के. डी. भुजबळ आणि विस्तार अधिकारी शिक्षण के. बी. खोडदे यांनी सहेली बचतगटाच्या अध्यक्षा यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी 200 रुपये किमतीची प्रत्येकी एक किलोची 144 पाकिटे मुदत बाह्य झालेली मिळून आली.