नंदुरबार । शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले बॅनर, पोष्टर, झेंडे न काढल्यास संबंधीतांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा नगरपरिषदेच्या मुख्याधिकार्यांनी दिला आहे. नंदुरबार शहरात विविध राजकीय पक्षांनी अथवा संघटनांनी बॅनर व पोष्टर लावले आहेत. दरम्यान नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 2 क मध्ये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे अशा स्वरूपाच्या बॅनर पोष्टरने आचारसंहितेचा भंग होत आहे. संबंधीत राजकीय पक्ष किंवा संघटनांनी बॅनर काढून घेणे गरजेचे आहे, तसे न झाल्यास नगरपरिषद प्रशासन ते काढून गुन्हे दाखल करण्याची कारवाई करेल, असा इशारा मुख्याधिकारी मुख्याधिकारी गणेश गिरी यांनी दिला आहे.