भामेर । निजामपूर येथील टपाल कार्यालयाचे पोस्टमास्तर अरूण बाबुराव निपाणेकर नुकतेच सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा निरोप समारंभ म्हसाई माता मंदिर परिसरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी सर्कल सचिव मंगेश परब होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सत्कारमूर्ती अरूण निपाणेकर, आशा पाटील, मालेगाव येथील डाकघर अधिक्षक एल.व्ही.सूर्यवंशी, कॉ. दिगंबर पाटील, पत्रकार राजेंद्र राणे, प्रकाश पाटील, कुंदन जाधव (धुळे), डी.एन.माळी (पुणे), रवींद्र मोरे (औरंगाबाद), महेश साळुंखे (पुणे) आदी उपस्थित होते. प्रास्ताविक विपनी चव्हाण यांनी केले.
निपानेकर यांना प्रतिमा भेट
याप्रसंगी निजामपूर पोस्ट कार्यालय त्या अंतर्गत बारा डाकर कर्मचारी यांच्या हस्ते अरूण निपाणेकर (पाटील) यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ व गुरूदेव दत्त यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकार राजेंद्र राणे व पोस्ट बचत प्रतिनिधी स्नेहल राणे यांनी देखील त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले. अरूण पाटील यांनी निजामपूर पोस्ट कर्मचारी ग्रामस्थांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे या पदापर्यंत पोहोचलो, असे सांगितले. कार्यक्रमासाठी शिरिष वाघ, भुषण, संदीप बोरसे, बंडू कोळेकर, जितेंद्र देवरे, बापू पाटील, आबा सोनवणे, हरी निकुंभ, जितेंद्र बागळ, अण्णा नेरकर, कैलास पाटील आदींनी परिश्रम घेतले.