पोहण्यास गेलेल्या चिचोलींच्या विद्यार्थ्याचा वाकी नदीत बुडून मृत्यू

0

जळगाव : वाकी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या सहावी इयत्तेतील विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मुत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास चिंचोली (जळगाव) येथे घडली. निखील संतोष सनानसे (10) चिंचोली असे मृत बालकाचे नाव आहे.

उपवासानिमित्त काही महिला आज नदीवर गेल्या होत्या. त्यामुळे निखील हादेखील काही त्याच्या मित्रांसोबत नदीकडे गेला. काही मित्र नदीत पोहत असल्याचे पाहिल्यानंतर निखील यालादेखील पोहण्याचा मोह झाला. कपडे काढुन निखिल उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने निखील गटागंळया घेत पाण्यात जाऊ लागला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुलांनी आरडाओरड केली. नदीपात्राकडील रस्त्यावरून जाणार्‍या येणार्‍या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकार लक्षात आल्यानंतर काही लोकांनी नदीपात्रात उड्या घेत बेपत्ता निखील याचा पाण्यात शोध घेतला.

एमआयडीसी पोलिसांनी केला पंचनामा
काही अवधीतच निखील बेशुध्दावस्थेत मिळून आला. त्यानंतर त्याला तात्काळ जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलिसांनी रूग्णालयात धाव घेत पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. निखील याच्या पश्चात एक भाऊ भावडू तसेच दोन बहिणी आई, वडील असा परिवार आहे. गावात ही घटना कळाल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात आली.