जामनेर । शहरातील मलीकनगर मधील 19 वर्षाच्या युवकाचा नदीवर पोहण्यास गेला असता पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार 10 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत सविस्तर असे की, शहरातील मुस्लीम वस्तीमधील मलीक नगर भागात राहणार्या वसीम शेख अस्लम (वय-19) हा आपल्या काही मिंत्रासोबत बोदवड रोडवरील कांग नदीच्या पात्रावरील बंधार्यावर पोहण्यास गेला असता. त्यास पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना घडली.
दरम्यान त्याला पाण्याबाहेर काढून उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आणले असता. वैद्यकीय अधिकार्यानी त्याला मृत घोषीत केले.याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला शेख अस्लम शेख शफी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहीती मिळताच मंत्री गिरीष महाजन यांनी तात्काळ रूग्णालयात धाव घेतली.