पौष्टीक खाद्य आहारात आढळली बुरशी

0

नवापूर । महाराष्ट्र शासन मार्फत 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील मुलांना पोष्टीक आहार दिला जातो.शासनाचा उद्देश आहे की गरीब आदिवासी मुले हे कुपोषित राहणार नाही.त्यासाठी शासनाची ही योजना सुरु आहे.पंरतु नवापुर तालुक्यातील बोकलझर येथे अंगणवाडी केंद्रामध्ये पुरविण्यात आलेला पोष्टीक आहारामध्ये शेवया आहारीत बुरशी लागलेला खाद्य पदार्थ आढळुन आल्याने एकच खऴखऴ उडाली असुन संताप व्यक्त होत आहे.यामुऴे हा प्रकार आदिवासी बालकांचे कुपोषण मुक्त करावयाचा आहे की आरोग्य बिघडवायचे आहे असा सवाल केला जात आहे.

तालुका कुपोषणमुक्त करायचा आहे
सदर प्रकार हा बोकलझर येथील जागृत सरपंच राहुल गावीत यांनी उघडकिस आणला असुन या प्रकरणा मुळे संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी माजी जि.प.अध्यक्ष भरत गावीत व शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांची भेट घेतली. यावेळी भरत गावीत म्हणाले की नवापुर तालुका हा आदिवासी बहुल वस्तीचा तालुका आहे हा तालुका काही दिवसात कुपोषण मुक्त करायचा आहे.त्यासाठी आमच्याकडुन जी मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत.परंतु शासनाची कुपोषण मुक्तीसाठी जी यंञना काम करत आहे. त्या यंत्रनेने पोष्टीक आहारासाठी राबविण्यात येणार्‍या योजना अधिकार्‍यानी प्रभावीपणे अमंलबजावणी केल्यास नवापुर तालुका हा कुपोषणमुक्त होईल तसेच बोकलझर येथील अंगणवाडीमध्ये लहान मुलांना पुरविण्यात येणार्‍या पोष्टीक आहारामध्ये ज्या बुरशी लागलेल्या शेवया आढळुन आल्या ही अत्यंत गंभीर बाब आहे.