मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
मुंबई:- भीमाकोरेगाव प्रकरणाचे व्हिडिओ फुटेज तपासण्यात येत आहे. यात जे कोणी दोषी आढळतील त्या कोणालाही सोडण्यात येणार नाही. सर्व दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विदयमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याचे आधीच घोषित करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाला त्याबाबत विनंती करणारे पत्र देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, व्हिडिओ फुटेज तपासण्यात येत आहेत. यात जे कोणी दोषी असतील त्यांना शोधून काढण्यात येईल. कोणालाही सोडण्यात येणार नाही. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या विदयमान न्यायाधीशांमार्फत करण्याचे घोषित करण्यात आले आहे. विदयमान न्यायाधीश मिळावेत यासाठी उच्च न्यायालयाला विनंती करणारे पत्र लिहिण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या प्रकरणी समाजात तेढ वाढणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. दोन समाज समोरासमोर उभे राहतील असे वक्तव्य कोणी करू नये. माध्यमांनी देखील या प्रकरणाचे वार्तांकन करताना संयम राखला आहे तो त्यांनी यापुढेही राखावा. जनतेने शांतता राखावी असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.