शहादा । प्रकाशातील कार्तिक स्वामीचे मंदिर आज दिवासभर दशर्ंनासाठी खुले होते. मंदिर समितीचा निर्णय वर्षातून एकदा कार्तिक स्वामींचे मंदिराचेद्वार एकच दिवस उघडत असल्याने या अनुषंगाने भाविकांचे कार्तिक स्वामी मंदिर आता हिंदू भाविकांची करिता आस्थेचे स्थान निर्माण झाले आहे. काळाचा प्रवाहामध्ये फार मोठा ओघ वाढला आहे. कार्तिक स्वामींचे मंदिराचा द्वार मंदिर समिती कार्यध्यक्ष रमेश ठाकरे यांनी पदाधिकारी यांचा उपस्थित दुपारी कार्तिक पौर्णिमेचा शुभ मुहूर्तचे औचित्ये साधून 1वाजून 46 मिनिटांनी दर्शनासाठी द्वार उघडण्यात आले. या प्रसंगीं सकाळ पासून मंदिराचा प्रांगणात लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महिला भावीनकांचा अधिक संख्या होती.
रात्री उशीरापर्यंत भाविकांची गर्दी
कार्तिक स्वामी, गणपती, महादेव पार्वती यांची पूजा आरती करण्यात आली. मोर पीसचे नैवद्य दाखवूंन पूजा अर्चा करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत भावीनकांचा ओघ वाढला होता. रात्री भजनाचा कार्येक्रम आयोजन करण्यात आले होते. धार्मिक पूजा साहित्य विक्री करीता दुकानं थाटली आहेत. मोरपिसांचा बाजार भरला आहे मोठी विक्री होत आहे. मंदीर समिती द्वारा खडीसाखर शेंगदाणेंचा प्रसाद स्वरूपात वाटप केले जात आहे. ग्रामप्रशसनाचा विकास आराखडाअंतर्गत मंदिर व परिसराचा भरारी असल्याने त्यास भक्कम जोड भक्तांची योगदान लाभल्याने मंदिराची सुधारणेच्या मोठी भरारी दिसून येत आहे. वतुळात समाधान व्यक्त केले जात आहे. परिणामी दर्शनासाठी भावीनकांचा ओघ वाढल्याने आज रोजी दिवस भर मंदिर खुले राहणार आहे. मंदिराचे पुजारी विनोद ढाकणे हे नवग्रह पूजा होमहवन पूजा पाठ आरती आदी कार्येसाठी योगदान देणार आहेत. रमेश माळीच सहपत्नीक हस्ते विधी पार पडणार आहे. समितीचे पदाधिकार्यांनी कामकाज पाहिले.