शहादा । सध्या संपुर्ण राज्यासह जिल्ह्यात वाळू वाहतुकीला व उपसा करण्यास महाराष्ट्रात बंदी आहे. शेजारील गुजरात राज्यातून चोरटी वाहतूक करून महाराष्ट्रात वाळू आणली जात असे. परंतु, तीचाही जिल्हाधिकार्यांनी आदेशा देऊन बंदी आणली. गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून नंदुरबार जिल्ह्यात पूर्ण बंदी आल्याने अनेक वाळूमाफीयांचे धंदे बंद झाले. अशात काल दि. 18 रोजी रात्री शहादा वाळू वाहतूक संघटनेचे पदाधिकारी ओंकार माळीसह काही सदस्य रात्री गुजरात राज्यातील वाळू ठिय्यावर मागील उधारीचे पैसे देण्यासाठी गेले असता त्या उबद गावातील ठिय्यावर काही डंपर महाराष्ट्रात जातांना दिसली. त्यांनी तात्काळ आपल्या सहकार्यांना भ्रमणध्वनीने पूर्ण माहिती दिली.
रात्री झाली कारवाई
तत्काळ ते 4 ही डंपर वाळूने भरलेले प्रकाशा चौफुलीवर वाळू वाहतूक करणार्या संघटनेच्या ओंकार माळीसह साथीदारांनी पकडून महसूलचे तलाठी जिजाबराव पाटील व मंडळ अधिकारी बी. ओ. पाटील यांना माहिती दिली. पंचनामासाठी रात्री 10 वाजता प्रकाशा येथे बोलावले. यावेळी मात्र वाळू वाहतूकदारांची व राजस्थानच्या ठेकेदारात मोठा वाद सुरू होता. त्याचवेळी वाळू वाहतुकीने तालुकाध्यक्ष श्री. जायस्वाल यांनी वाद घातला.
ठेकेदाराचा वाद विकोपाला
यावेळी संबंधीत ठेकेदार गोर्धनसिंग यांनी सांगितले की, आम्ही राष्ट्रीय काम करीत आहोत. रस्त्यांचे काम त्वरीत व्हावे यासाठी जिल्हाधिकार्यांकडून तशी परवानगी घेतली. तरी आपण सहकार्य करावे. परंतु हा वाद विकोपाला जात असल्याचे पाहू वाळू वाहतुकदारांनी सांगितल्याप्रमाणे 4 ही डंपर प्रकाशा दूरक्षेत्राला जमा केली. याच ठिकाणी अनधिकृतपणे वाळू वाहतूक करीत असलेल्या डंपर क्रमांक आरजे 23 जीआर 4697, आरजे 23 जीआर 4697, आरजे 24 जीआर 2277, व एमएच 39 एडी 0185 हे डंपर अनधिकृतपणे वाळू वाहतूक करीत असतांना आढळून आले असून तसा पंचनामा तलाठी जिजाबराव पाटील व बी.ओ.पाटील यांनी केला.