प्रकाशा ते तोरणमाळ कावड यात्रा निघणार

0

शहादा । प्रकाशा ते तोरणमाळ कावड यात्रा शनिवार 29 जुलै 2017 रोजी सकाळी 8 वाजता केदारेश्वर मंदिर प्रकाशा तालुका शाहादा येथुन निघेल व रात्री अवघे येथे मुक्काम राहिल. रविवार 30 जुलै रोजी सकाळी कावड यात्रा कोटबांधणी येथे मुक्कामासाठी निघेल. सोमवार 31 जुलै रोजी तोरणमाळ दुपारी 12 वाजेपर्यंत गादि गोरक्षनाथ मंदिर येथे महंत योगी संजुनाथ महाराज यांच्या उपस्थितीत जलभिशेक व महाप्रसादा चा कार्यक्रम होईल. तरी सदर कावड यात्रेस बहुसंख्य बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन किशोर पाटील, यश पाटील, हिरालाल पाटील, लाला पाटील, प्रवीण पाटील यांनी केले आहे.