शिंदखेडा । तालुक्यातील प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेला भरीव निधी उपलब्ध होवून कामास गती मिळावी, यासाठी संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांनी नूकतीच माजी केेंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादीचे खा.शरद पवार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, प्रकाशा-बुराई योजनेचा पंतप्रधान कृषि सिचाई योजनेत समावेश करून बुराई नदीवरून मालपूर धरण व वाडी धरण भरण्यात यावे.
मुंबई येथे घेतली भेट
ही योजना झाल्यास केवळ शिंदखेडा तालुक्यातील शेतीलाच पाणी उपलब्ध होणार नसून अनेक योजना नव्याने सुरु होवून तालुक्याचा कायापालट होणार आहे. खा.शरद पवार यांची मुंबई येथील निवासस्थानी भेट घेवून निवेदन देण्यासाठी संघर्ष समितीचे निमंत्रक तथा पंचायत समिती सदस्य सतिष रामराव पाटील, पं.स. सदस्य मनोहर देवरे, शिंदखेडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन विठ्ठलसिंग गिरासे, मालपूर वि.का.सोसायटी चेअरमन पंढरीनाथ माळी आदी गेले होते.