प्रकाश जावडेकरांनाही स्वाईन फ्लूची लागण

0

पुणे । केंद्रीय मन्युष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकरांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. स्वाईन फ्लूमुळे जावडेकर गेले दोन दिवसांपासून संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ शकले नाहीत. पुणे येथील वॉटर कपच्या कार्यक्रमात बॉलिवूड आमीर खानने आपल्याला आणि किरण रावला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समजते आहे. त्यांच्यावर दिल्लीतल्या निवासस्थानी उपचार सुरू आहेत.