प्रकाश तेली यांना समाजभूषण पुरस्कार

0

जळगाव । श्री माता मनुदेवी बहुउद्देशीय संस्थेतर्फे 2016-2017 चा श्री माता मनुदेवी समाज भूषण पुरस्कार प्रकाश तेली यांना प्रदान करण्यात आला. ते बेटी बचाव, जागो ग्राहक जागो, वृक्षरोपण, राष्ट्रीय एकात्मता, एड्स जनजागृती, जलप्रदूषण, जल ही तो कल है, वीज वाचवा, व्यसनमुक्ती विविध सामाजिक 60 संदेश समाज प्रबोधन दिनदर्शिका दरवर्षी काढत असून तिचे मोफत वितरण ग्रामीण, अनुसूचीत, जाती, जमाती व दुर्बल घटकांना देत आहे.

ग्रामीण भागातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व
श्री तेली यांच्या कार्याची दखल घेवून दर्जी फाऊंडेशनचा युवा चेतना पुरस्कार सन 2016 मध्ये मिळालेला आहे. ग्रामीण भागातील एक हुरहुन्नरी व होतकरू व्यक्तिमत्व असून विविध माध्यमातून व स्वखर्चातून समाज प्रबोधनाचे करून त्यांची या पुरस्काराकरिता निवड करण्यात आली असे संस्थेचे अध्यक्ष मुकेश सोनवणे यांनी यावेळी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे, जि.प.सदस्य प्रताप पाटील, जि.प.सदस्य पवन सोनवणे, दिनेश सोनवणे, बबलू सपकाळे, मनोज बुलाखी व संस्थेचे व शाळेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.