प्रकाश पादुकोण यांना पुरस्कार

0

कोच्ची । भारताला पहिले ऑल इंग्लंड स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देणार्‍या प्रकाश पादुकोण यांची भारतीय बॅडमिंटन महासंघातर्फे देण्यात येणार्‍या पहिल्या जीवनगौरव पुरस्कारसाठी निवड करण्यात आली आहे.

महासंघाचे प्रमुख हिमांता विश्‍वास सरमा यांनी या पुरस्कारांची घोषणा करताना सांगितले की, जीवनगौरव पुरस्कार अंर्तगत प्रशस्तिपत्रक आणि रोख 10 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येईल. सरमा म्हणाले की, बंगळुरू येथे झालेल्या कार्यकारिणीच्या मागील बैठकित बॅडमिंटन खेळासाठी मोलाचे योगदान देणार्‍या एक व्यक्तीला प्रत्येक वर्षी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय झाला होता.