निंभोरा । प्रत्येक देशाच्या प्रगतीमध्ये त्या देशातील संशोधन कार्याचे महत्वपूर्ण योगदान असते. त्यामुळे प्रगतीशील राष्ट्र निर्मितीसाठी ई-संसाधनांचा वापर करणे उपयुक्त झालेले आहे, असे प्रतिपादन ग्रंथपाल प्रा. राहुल खंडारे यांनी केले. ते ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने आयोजित ‘एन-लिस्ट: महाविद्यालयीन संशोधकांसाठी एक वरदान’ या विषयावरील कार्यशाळेत बोलत होते. प्रा. खंडारे यांनी एन-लिस्ट कन्सोर्शियाविषयी विस्तृत सादरीकरण केले. तसेच या कन्सोर्शियामध्ये उपलब्ध असलेल्या जगातील नामांकित प्रकाशकांच्या संसाधनांची माहिती दिली. कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जे.बी. अंजने यांनी प्राध्यापकांनी संशोधन कार्यात ई-संसाधनांची मदत घेऊन, अद्ययावत संशोधन करून अध्यापनाचे कार्य करावे, असे आवाहन केले. प्रा. एम.के. सोनवणे यांनी आभार मानले. कार्यशाळा यशस्विततेसाठी उपप्राचार्य डॉ. एस.ए. पाटील, प्रा. एच.एम. बाविस्कर, प्रा. एन.यु. बारी, प्रा. के.एल. हेरोळे, प्रा. एस.पी. उमरीवाड, प्रा. व्ही.एन. रामटेके, डॉ. पी.आर. महाजन, डॉ. डी.बी. पाटील, प्रा. दिलीप सोनवणे, पवन गजरे यांनी सहकार्य केले.