सलग दुसर्या वर्षी दमदार कामगिरी
हे देखील वाचा
निगडी : प्राधिकरण येथील प्रेरणा माध्यमिक विद्यालयात येथे इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेण्यार्या प्रगती गायकवाडला कुस्तीमध्ये कांस्य पदक मिळाले आहे. प्रगती गायकवाड हिने गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या 63 व्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुध्दा ब्रांझ पटकविले होते. त्यामुळे हे तिचे सलग दुसरे राष्ट्रीय पदक आहे. पिंपरी-चिंचवड शहराला महिला कुस्ती वर्गातून सलग दुसरे राष्ट्रीय पदक दिले आहे. कुस्तीचे प्रशिक्षण गुरूकुल कुस्ती संकुल सोमाटणेफाटा येथे आंतरराष्ट्रीय पैलवान व वस्ताद पै. शंकर कंधारे, वडील विनोद गायकवाड यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. प्रगतीच्या वजनगटात भारतातून 17 राज्याच्या महिला कुस्तीगीर होत्या. पहिल्या फेरीत प्रगतीने पंजाबच्या अनशुला हिस 10-0 ने पराभूत केले. दुसर्या फेरीत सीबीएसईच्या प्रिया सिंग हिला 10-0 ने पराभूत केले. तिसर्या फेरीत हरियाणाच्या तपस्या हिच्याकडून अटीतटीच्या लढतीत प्रगतीला पराभव स्वीकारावा लागला. कांस्यपदकाच्या लढतसाठी प्रगतीने पहिल्या फेरीत गुजरातच्या श्रद्धा वडेर हिला एकतर्फी लढत करीत 10-0 ने पराभूत केले. अंतिम लढतीत मध्य प्रदेशच्या पैलवान शिवानी शर्मा हिच्या बरोबर अटीतटीच्या लढतीत प्रगतीने विजय मिळवून कांस्यपदकावर नाव कोरले.