लोणावळा : इंदोरी मावळ येथील प्रगती विद्या मंदिर शाळेतील आठ विद्यार्थीं राष्ट्रीय दुर्बल घटक परीक्षा (एनएमएमएस) व राष्ट्रीय प्रज्ञाशोध (एनटीएस) परीक्षेत गुणवत्ता यादीत आले असून पुजा हरकीसिंग कुशवाह हीने राज्यात चौथ्या येण्याचा बहुमान मिळवला. मावळ तालुक्यात एकूण एकोणीस विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून यातील आठ विद्यार्थीं या शाळेतील आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी हरुण अत्तार, उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, संस्था सचिव संतोष खांडगे यांच्या हस्ते करण्यात आला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
कार्यक्रमाला मावळ पं.स.चे सभापती गुलाबराव म्हाळस्कर, उपसभापती शांताराम कदम, जि.प. सदस्य नितीन मराठे, जि.प.चे माजी सदस्य प्रशांत ढोरे, पं.स. सदस्या ज्योती शिंदे, गटशिक्षणाधिकारी संजय तांबे, खजिनदार सुरेशभाई शहा, शालेय समिती अध्यक्ष दामोदर शिंदे, महेशभाई शहा, प्रा. डी.डी. मुंद्रा, स्पर्धा समन्वयक बुरांडे उपस्थित होते. यावेळी अत्तार यांनी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. तर उपशिक्षणाधिकारी कारेकर यांनी शाळेच्या यशस्वी उपक्रमाबद्दल कौतुक केले. संतोष खांडगे यांनी 1965 साली सुरू झालेल्या शाळेचा आजपर्यंतचा लेखाजोखा मांडला. विद्यार्थ्यांना समीर गाडे, रियाज तांबोळी, रुपेश शिंदे, छाया कर्डिले यांनी मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दशरथ ढमढेरे, पर्यवेक्षक बलभीम भालेराव, रेवप्पा शितोळे, संजय खराडे, संजय शिंदे, लक्ष्मण मखर, मच्छिंद्र बारवकर, राजू पोटे, चंद्रकांत धनवे, रांजेद्र वाजे, दिलीप हिरोडे, संपत गाडे, मधुकर गुरव, तुळशीदास सातकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी केले. सूत्रसंचालन रुपेश शिंदे तर आभार पांडुरंग कापरे यांनी मानले.