प्रगत राष्ट्रासाठी कॅशलेस प्रणालीचा वापर करा

0

मुक्ताईनगर । आजचे युग संगणक युग असून काळानुसार बदल स्विकारणे गरजेचे आहे. राष्ट्र प्रगत होण्यासाठी शेतकर्‍यांनी कॅशलेस प्रणालीचा वापर केला पाहिजे. त्यामुळे पंतप्रधानांनी पाहिलेले कॅशलेसचे स्वप्न साकार होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन माजी महसुलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी केले. मुक्ताईनगर येथील जेडीसीसी बँकेच्या शाखेत शेतकर्‍यांना एटीएम व रुपे डेबिट कार्डचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करताना आमदार खडसे बोलत होते.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा बँकेचे विभागीय उपव्यवस्थापक सुहास सोनवणे, मुक्ताईनगर शाखा व्यवस्थापक आर.बी. महाजन, क्षेत्रीय अधिकारी जी.के. महाजन, अशोक ढाके, स्विय्य सहाय्यक योगेश कोलते, बोदवड बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, कोथळी विकासो सचिव अजाबराव पाटील, सालबर्डी विकासो सचिव गोकुळ पोहेकर यांची उपस्थिती होती. तसेच शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अ‍ॅड. रोहिणी खडसे – खेवलकर यांनी केले. यावेळी सुरेश चौधरी, रामचंद्र चौधरी, रविंद्र चौधरी, मनोहर जंगले, निळकंठ चौधरी, एकनाथ झाल्टे, एकनाथ पाटील, प्रभाकर बढे, प्रभाकर झोपे, रामचंद्र खडसे अशा सालबर्डी आणि कोथळी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या शेतकरी सभासदांना एटीएम किसान व एटीएम रुपे डेबिट कार्डचे वितरण करण्यात आले. यशस्वीतेसाठी प्रदिप चौधरी, राजमेश जोगी, निखिल उदलकर, विजय पाटील यांनी परिश्रम घेतले.