प्रचाराचा आज शेवटचा दिवस; राज्यात दिग्गजांची प्रचारसभा !

0

मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी २१ रोजी मतदान होत आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील सर्व बड्या नेते मैदानात उतरणार असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभांकडे महाराष्ट्राचे विशेष लक्ष आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अकोले आणि कर्जत येथे नियोजित सभा आहे. अहमदनगरमधील कर्जत येथे शरद पवार यांची प्रचारसभा थोड्याच वेळात सुरू होणार असून भर पावसामध्ये नागरिक या सभेला येत आहेत. पाऊस सुरू असल्यामुळे सभास्थळी छत्र्या घेऊन लोक उभे आहेत.

शरद पवार यांची आज बारामतीमध्ये प्रचारसभा आहे.