प्रचार संपल्यानंतर मोदी पोहोचले केदारनाथच्या दर्शनाला; करणार ध्यान

0

रुद्रप्रयाग: लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यातील मतदान झाले असून शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराची काल १७ रोजी सांगता झाली. लोकसभेच्या या सातही टप्प्यात राजकीय नेते मंडळी व्यस्त होते. दरम्यान आता प्रचार संपला असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारनाथाचे दर्शन घेतले. मोदींनी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पूजा केली. यानंतर मोदी केदारनाथमध्ये ध्यान करणार आहेत. मोदींचा उत्तराखंड दौरा दोन दिवसांचा आहे. यानंतर ते सोमवारी बद्रिनाथला जातील.

आज सकाळी मोदी उत्तराखंडला पोहोचले. त्यानंतर तिथून ते केदारनाथमध्ये दाखल झाले. मोदींचा गेल्या पाच वर्षांमधला हा चौथा केदारनाथ दौरा आहे. मोदींनी मंत्रोच्चरात विशेष पूजा केली. पुजाऱ्यांनी त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली आणि चंदनाचा टिळा लागला. त्यानंतर पंतप्रधानांनी मंदिरात बराच काळ साधना केली. मोदींनी मंदिराला प्रदक्षिणा घालत उपस्थित भाविकांना अभिवादनही केलं.