जळगाव- शहरातील प्रजापत नगरात एकाच रात्री चोरट्यांनी बाहेरगावी केलेल्या तीन कुटुंबियांचे बंद घरे फोडून दागिणे, रोकड तसेच कपडे असा लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना शुकवारी सकाळी समोर आली आहे. एका घराच्या शेजारच्यांमुळै तीनही ठिकाणच्या चोरीच्या घटनां उघड झाल्या आहेत. एकाच रात्रीच्या तीन चोरीच्या घटनांनी येथील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून पोलिसांची गस्त होत नसल्याने घटना घडल्याचा संतापही येथील रहिवाशांनी व्यक्त केला आहे.
प्रजापत नगरातील हनुमान मंदिराच्या पाठीमागील बाजूस मुख्य रस्त्यालगत निरज दिलीप व्यास, राजस्थानी स्वयंपाकी कारागिर शंकरलाल गंगाराम ओझा, बलदेवभाई पटेल या तीनही कुटुंबियांची घरे चोरट्यांनी फोडले आहे. व्यास यांच्या घरातून 10 ग्रॅम सोन्याचे दागिणे, 20 हजार रुपये रोख असा 30 ते 40 हजार रुपयांचा एैवज लांबविला. तर ओझा यांच्या घरातून 15 ते 20 हजार रुपयांची रोकड लांबविली. बलदेवभाई पटेल हे गावाहून परतल्यावर त्यांच्या घरुन नेमका किती मुद्देमाल लांबविला हे समोर येणार आहे. दरम्यान तिघाही ठिकाणच्या घटनेच चोरट्यांनी चिल्लरला हातही लावलेला नाही हे विशेष. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.