प्रजापिता ब्रह्मकुमारीचा शिवमहोत्सव

0

वरणगाव । प्रजापिता ब्रम्हकुमारीच्या वतीने भव्य शिव महोत्सवाचे आयोजन रेणूका नगर येथे करण्यात आले आहे . सदर उत्सव 8 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालिकेच्या नगराध्यक्षा अरुणा इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी संभाजी देशमुख, रोहिणी जावळे, चंद्रकांत बढे आदी मान्यवर उपस्थित होते. उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे 36 फुटाची शिवलिंगाची प्रतीकृती आहे. तसेच या महोत्सावात व्यसनमुक्ती, आत्मा परमात्मा, अध्यात्मीक जीवन या विषयी चित्र प्रदर्शन लावण्यात आलेले आहे.

तणावमुक्ती व मनशांतीचा संदेश
महोत्सावात व्यसनमुक्तीवर नाट्य सादर करण्यात येत आहे. याप्रसंगी पद्मा बहण यांनी ब्रम्हकुमारी विश्‍व विद्यालयाच्या वतीने तणावमुक्ती व मनशांतीचा संदेश देत असल्याचे सांगितले. महोत्सव यशस्वितेसाठी वरणगाव केंद्राच्या संचालिका पद्मा दिदी, अश्विनी बहन, प्रमिला माता, विजया माता, नलीनी बहन, इंदू फेगडे, बाळू, अरूण, वंसत, ओंकार, मनोज, देवेद्र आदींनी परिश्रम घेतले.