प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा मान राखण्याची मागणी

0

चोपडा । हिंदू जनजागृती समितीतर्फे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा मान राखावा, यासाठी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मागणी करतांना सांगितले होते की, 15 ऑगस्ट स्वात÷त्र्य दिनी, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक झेंडे विक्री होत आहे. परंतु हे झेंडे ध्वजारोहन झाल्यानंतर तसेच दुसर्‍या दिवशी हे ध्वज कचरा, गटारी, रस्त्यावर पडलेले असतात. यामुळे आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा अपमान होतो. यासाठी हिंदू जनजागृती समिती या गोष्टीचा लढा अनेक वर्षांपासून देत आहे. तसेच शाळा, कॉलेज, शासकीय ठिकाणी जाऊन राष्ट्र प्रभोधन क रीत आहे. तरी शासनाने राष्ट्रीय ध्वजाचा अपमान या लढाकडे लक्ष देऊन प्लास्टिक झेंडे विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने निवेदन देऊन केली. सुधाकर चौधरी, भालचंद्र राजपूत, राजू दुसाणे, रामकृष्ण चौधरी, डिगंबर माळी, किशोर दुसाणे यांची उपस्थिती होती.