चोपडा । तालुक्यातील राजेंद्र पांडूरंग सोनवणे, बदसिंग बारेला (रा. विरवाडे) व इतर लोक यांनी वनविकास महामंडळात वनमजूर म्हणून दीर्घकाळ सेवा केलेली आहे. त्यांना बेकायदेशीररित्या कामावरून कमी केले त्यामुळे वनमजूर यांनी न्यायालयात दाद मागीतली असता न्यायालयाने संबंधीत वनमजूर यांनी कामावर पुन्हा घेण्याचे आदेश केले व उच्च न्यायालय मुंबई यांनी 1998 पासून त्यांना कायमस्वरूपी नेमणुकीचे आदेश केले असले तरी वनविभागाने कोणतिही दखल अद्यापर्यंत घेतली नाही.
साकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन
वनविभाग प्रशासनाने कोणतीही अंमलबजावणी न केल्यामुळे कामगारांनी वेळावेळी पाठपुराव केला. कामावर न घेतल्याने वनमजूरांची व त्यांच्य कुटूंबाची उपासमार होत आहे व त्यांना दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे व्यथीत होवून वनकामगारांनी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी तहसिल कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची पुर्वसुचना देवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतू वेळीच पोलसांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. याबाबत न्यायालयीन आदेश व शासकीय आदेशाची अंमलबजावणी केल्याची विनंती कामगारांनी तहसिल चोपडा यांच्या मार्फत शासनास केलेली आहे. व पोलिसांनी देखील वनप्रशासन व कामगारांची संयुक्त बैठक घेवून चर्चा घडवून आणून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.