मुंबई : प्रतिनिधी – प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संविधान बचाव मार्च काढण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठातील आंबेडकर पुतळा ते गेट वे ऑफ इंडिया येथे विनापक्ष विनाझेंडा आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यघटना वाचविण्यासाठी त्याची छेडछाड रोखण्यासाठी संविधान बचाव रॅली आम्ही काढणार आहोत, असे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अनंतकुमार यांच्या वक्तव्यावर शेट्टी म्हणाले, राज्यात सत्ता असली तरी तुम्हाला राज्य घटना बदलू देणार नाही. जनतेने सत्ता दिली ती विकासासाठी घटनाबदलासाठी नाही. विकासासाठी मते मागून घटनाबदलाचा कार्यक्रम राबविण चुकीचे आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले. राजू शेट्टी, जितेंद्र आव्हाड, राजीव सातव यांनी मुंबई पत्रकार संघात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. शरद पवार, शरद यादव, सीताराम येचुरी, सुशीलकुमार शिंदे, डी. राजा, तुषार गांधी, अल्पेश ठाकूर यांच्यासह अनेक सर्वपक्षीय नेते यात सहभागी होत आहेत.