भुसावळ : शहरातील प्रज्ञासुर्य प्रतिष्ठानतर्फे मुंबईचे लोककवी व गायक प्रा. प्रशांत मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. जुने आठवडे बाजारातील तेली मंगल कार्यालयात 6 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता ते ‘आई एक महाकाव्य’ या विषयातून आईचे महत्व सांगतील. प्रतिष्ठानची बैठक शनिवारी मानक बाग येथील प्रा. जतिन मेढे यांच्या निवासस्थानी झाली. त्यात प्रा. मोरे यांच्या 5 हजार 700 व्या प्रयोगाची सुक्ष्म रुपरेषा ठरविण्यात आली. याच वेळी आयोजन समिती तयार करण्यात आली.
आयोजन समितीत यांचा आहे समावेश
समिती अध्यक्ष डॉ. राजेश मानवतकर, सहसचिव डॉ. मधू मानवतकर, अजय पाटील, प्रा. नामदेव कोळी, प्रा. वर्षा नेहेते, धिरज पाटील, प्रा. आर.एच. पाटील, संघरत्न सपकाळे, डॉ. नि.तु. पाटील, प्रशांत तायडे, संजय भारंबे, विवेक नरवाडे, लिलाधर वानखेडे, संजय भटकर, नाना पाटील, विनोद शेजवळ, प्रा. निलेश गुरचळ, प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, आनंद सपकाळे, ऊर्मिला चौधरी, ज्ञानेश्वर घुले, विजय जावळे, डॉ. जगदिश पाटील, संदिप पाटील, नरवीरसिंह रावळ, शिशिर जावळे, रणजित राजपूत, सी.पी. पाटील, सिमा भारंबे, प्रा. पंकज पाटील, निलेश रायपुरे, चंद्रकांत चौधरी यांचा समावेश आहे.
लोककवी प्रा. मोरे यांचे काव्य गायन तसेच व्याख्यानाचे 5 हजार 700 कार्यक्रम झाले आहे. ‘चिमण्यांच्या चोचीत दाणे’, ‘हरविलेले गाणे’, ‘ललित अंतरंग’ ही त्यांची साहित्य संपदा प्रकाशित झाली आहे. ‘तहान’ या मराठी चित्रपटात त्यांनी पार्श्वगायन केले आहे. साहित्यातील माय घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न ते ‘आई एक महाकाव्य’ या विषयातून करणार आहे. तरी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.