Jalgaon jail guard’s wife committed suicide by hanging herself जळगाव : शहरातील निमखेडी शिवारातील प्रज्ञा कॉलनीतील रहिवासी कल्याणी विशाल सोनवणे (27) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना बुधवार, 29 रोजी सकाळी उघडकीस आली. विवाहितेने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
कारागृहातील रक्षक विशाल सोनवणे हे मंगळवारी रात्रपाळीला ड्युटीवर होते. त्यामुळे घरी त्यांची पत्नी, कल्याणी, सासू, सासरे व मुलगी होते. बुधवारी सकाळी विशाल हे घरी परतले असता त्यांना पत्नी कल्याणी या वरच्या मजल्यावरुन खाली का आल्या नाहीत. हे बघण्यासाठी ते वरच्या मजल्यावर गेले असता त्यांना आपल्या पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ घटनेची माहिती जळगाव तालुका पोलिसांना दिली. पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविला. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.