प्रणाली, सतीश इलिट करंडकचे मानकरी

0

पुणे । असोसिएशन ऑफ लायन्स क्लब इंटरनॅशनलतर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन हिंदी-मराठी सिनेगीत स्पर्धेचा फिरता इलिट करंडक खुल्या गटातून मुलींमध्ये प्रणाली काळे हिने, तर मुलांमध्ये सतीश शिरसाट यांनी पटकावला. ज्येष्ठ नागरिकांच्या गटातून सीमा महाजन यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यांना 5 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि करंडक देऊन गौरविण्यात आले.

एसएनडीटी महाविद्यालयातून संगीत शिक्षण घेतलेल्या प्रणालीने परीक्षकांसह सर्वांचीच वाहवा मिळवली. अमली गोखले, सृष्टी सोंडकर याना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल शरदचंद्र पाटणकर, संयोजिका जयश्री पेंडसे, अनुराधा शास्त्री, वैशाली कोकणे, सुनीता चिटणीस, सुनीता शिर्के, सुरेश शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रणाली व सतीशने प्रथम क्रमांक पटकावित फिरता करंडक, स्मतिचिन्ह व रोख रुपये 5000 चे बक्षिस मिळवले. द्वितीय क्रमांक मिळालेल्या अक्षय वाव्हळेला स्मतिचिन्ह आणि 3000 हजार रुपये रोख, तर तृतीय क्रमांक मिळवलेल्या प्रणालीला स्मतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आंतरमहाविद्यालयीन सिने-गीतांच्या स्पर्धेत एकूण 60 स्पर्धकांनी सहभाग घेतला. अंतिम फेरीत 10 विजेत्यांची निवड करण्यात आली. गझल, कव्वाली, भावगीते आणि नव्वदीच्या दशकातील लोकप्रिय वैविध्यपूर्ण अशी गाणी विद्यार्थ्यांनी सादर केली. मंजुश्री ओक, रेखा कुलकर्णी आणि राजश्री महाजनी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. सूर, लय आणि शब्दभाव याचे महत्व पटवून देत मंजुश्री ओक यांनी गाण्यातील बारकावे स्पर्धकांना सांगितले. श्रोत्यांनी सूर, लय आणि शब्दभाव याचा मिलाफ स्पर्धकांच्या गाण्यांतून अनुभवला. करंदीकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद गुंड यांनी यांनी आभार मानले.