प्रणॉय, पी. कश्यप, अजय विजेतेपदाच्या शर्यतीत

0

ऑकलंड । अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणारा भारताचा एच.एस.प्रणॉय मंगळवारपासून सुरू होणार्‍या न्यूझीलंड ग्रापी गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीच्या लढतीत आपला सध्याचा फॉर्म कायम राखण्याच्या इर्‍याद्याने कोर्टवर उतरेल. वेगवेगळ्या दुखापतींनी त्रस्त असलेल्या प्रणॉयने अमेरिकन ओपनआधी दिडवर्षापूर्वी स्विस ओपन स्पर्धा जिंकली होती.अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर प्रणॉयने जागतिक मानांकनात 17 व्या स्थानावर झेप घेतली आहे. न्यूझीलंड ओपन स्पर्धेतील पहिल्या फेरीत त्याचा सामना इंडोनिशीयाच्या शेसार हिरेन रुस्तावितोशी होईल. दुसरीकडे अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारा पारुपली कश्यपही आपला फॉर्म कायम राखण्याच्या इर्षेने खेळेल. राष्ट्रकुल विजेता कश्यप आता 47 व्या स्थानावर आहे. पहिल्या फेरीच्या लढतीत कश्यपसमोर इंडोनिशीयाच्या डियोनिसियस हेयोमचे आव्हान असेल.