जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात विद्यार्थी सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असून त्याचे मंगळवारी उद्घाटन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या उपस्थितीत झाले. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्हयातील विद्यार्थ्यांची गौरसोय टाळण्यासाठी फैजपूर, चाळीसगाव, शहादा, नंदूरबार, अमळनेर आणि धुळे या सहा ठिकाणी विद्यार्थी सुविधाकेंद्र सुरु होतील. अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात केंद्रप्रमुख विनोद पाटील यांच्या हस्ते प्रारंभ झाला.
एमकेसीएलचा प्रतिनिधी असणार उपलब्ध
गेल्या आठवडयात नंदूरबार येथील एकलव्य प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थी सुविधा केंद्र सुरु करण्यात आले. आज अमळनेर येथे दुसरे केंद्र सुरु झाले. विद्यार्थ्यांना अनेकदा गुणपत्रक, श्रेणीसुधार, परीक्षा, पात्रता आदी विविध कामांसाठी विद्यापीठात यावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक ताणही पडत होता. ही विद्यार्थ्यांची गौरसोय व आर्थिक ताण टाळावा यासाठी हे सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. एमकेसीएलचा प्रतिनिधी या केंद्रात पूर्णवेळ कार्यरत राहणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी 50 पेक्षा अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. त्यांच्यांशी कुलगुरुंनी थेट संवाद साधला व त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.
यांची होती उपस्थिती
डॉ.डी.एन.गुजराथी, प्राचार्य डॉ.ज्योती राणे, प्राचार्य डॉ.प्रमोद पवार, प्राचार्य डॉ.व्ही.एस.देसले, संचालक डॉ. एस.आर.चौधरी तसेच कार्याध्यक्ष प्रा.सुधीर पाटील, प्रा.धीरज वौष्णव, उपप्राचार्य डॉ.पी.बी.बर्हाटे, प्रा.शिरोडे, सौ.डॉ.माहेश्वरी, डॉ.दिलीप भावसर, डॉ.जे.आर.गुजराथी, कार्यकारी अभियंता सी.टी.पाटील, कनिष्ठ अभियंता, विनय देसले, एस.पी.नेमाडे, गोकुळ पाटील, प्रा.राधिका पाठक, अमृत दाभाडे हे उपस्थित होते.
या आहेत सुविधा
प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. केंद्रात विविध प्रमाणपत्रांच्या मागणीचे, प्रमाणपत्र तपासणी, प्रमाणिकरण संदर्भातील अर्ज, विद्यापीठाशी संबंधित सर्व प्रकारचे शुल्क ऑनलाईन अर्जासह स्वीकारण्याची सोय,परीक्षा विषयक अर्ज,परीक्षा देण्यासंदर्भातील संधी संपणे, संधीवाढ व तद्अनुषंगिक कामे, निकालानंतर पुनर्मुल्यांकन, निकाल राखीव असणे, फोटो कॉफी, व्हेरीफिकेशन सुविधा आहे.