अमळनेर । प्रताप महाविद्यालयात रासेयोचे नवीन शैक्षणिक वर्षात उद्घाटन झाले. याप्रसंगी वसतीग्रह प्रमुख प्रा.डॉ.मुकेश भोळे यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयाच्या परीसरात स्वच्छ मोहीम रावबण्यात आली. वरिष्ठ विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवाच्या कथनातून रा.से.यो.चे सामाजिक महत्त्व विशद केले. प्राचार्या ज्योती राणे यांनी मार्गदर्शन केले. रा.से.यो.च्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासासाठी मोठी संधी आहे. त्याचा उपयोग समाजासाठी करा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच माजी कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.संदीप नेरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना घडवण्यात रासेयो मोठे योगदान आहे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नीलेश पवार यांनी प्रास्ताविक, तर प्रा.वृषाली वाकडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.अवित पाटील यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी विद्यार्थी प्रतिनिधी तुषार पाटील आदींनी प्रयत्न केले.