चोपडा । येथील प्रताप विद्या मंदिरात शताब्दी वर्षानिमित्त इंग्रजी विषयासंदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. यात प्रा.डॉ.झेड.एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रा.डॉ.झेड.एन. पाटील यांचे स्वागत संस्थेच्या सचिव माधुरी मयूर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय मुख्याध्यापिका अरुणा पाटील यांनी करून दिला. प्रा.झेड.एन.पाटील यांनी विद्यार्थ्यांना हसत खेळत इंग्रजी विषय कसा शिकवायचा, हे सांगितले.
22 देशात केले आहे मार्गदर्शन
यात वाक्य तयार करणे, कृतीवरून काळ तयार करणे, स्पेलिंग तयार करणे, शब्द संग्रह वाढविणे या विषयांवर प्रा. पाटील यांनी मार्गदर्शन केले आणि इंग्रजी विषयाची भीती घालवाली. या वेळी प्रशाळेचे उपमुख्याध्यापक डी.व्ही.याज्ञीक, पर्यवेक्षक डी.के.महाजन, ए.टी. पाटील, एस.आर.पाटील, नागलवाडी येथील प्रशाळेचे मुख्याध्यापक आर.बी.देशमुख तसेच विविध शाखेचें इंग्रजीचे व विज्ञान विषयाचे शिक्षक बंधू भगिनी व गोविंद गुजराथी , उल्हास गुजराथी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार उपप्राचार्य डी.एस.पांडव यांनी मांडले. प्रा.डॉ. झेड.एन.पाटील आतापर्यंत इंग्रजी विषयाच्या चर्चासत्रासाठी 22 देशात गेले आहेत. सरकारतर्फे ते व्हिएतनाम येथे तीन वर्षे , जपान येथेही तीन वर्ष गेले होते. जपान मध्ये तीन वर्षे इंग्रजी भाषा सल्लागार म्हणून काम केले आहे. सेवानिवृत्तनंतर ते अनेक शाळा, महाविद्यालयात इंग्रजी विषयावर मार्गदर्शन करतात.