चोपडा। चोपडा एज्युकेशन सोसायटी संचालित प्रताप विद्या मंदिराच्या प्राथमिक विभागातील तिसरीच्या एमटीएस परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम सरस्वतीपूजन करण्यात आले, कार्यक्रमाचे प्रास्ताविकात मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी शाळेतील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर राबविण्यात येणार्या उपक्रमांसोबत मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वाढदिवसाला चॉकलेट वाटण्याऐवजी एक पुस्तक शाळेला भेट द्यावे, अश्या स्वरूपातील एक विद्यार्थी-एक पुस्तक हि योजना राबविली व विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांनीही यात सहभाग घेतला. गेल्या वर्षभरात जवळपास 200 पुस्तके यात जमा केली असून प्रत्येक भेट देणार्या मुलाला एक पुस्तक भेट दिले आहे. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या सचिव व कार्यक्रमाच्या अध्यक्ष माधुरीताई मयूर, मुख्याध्यापक सुनील पाटील, पर्यवेक्षक ए.टी. पाटील व पालक वर्ग उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन: यावेळी एमटीएस परीक्षेत चोपडा केंद्रात रूपक महाजन, धनश्री योगेश सनेर, आशिष नितीन जैन, हर्षल श्रीराम सोनार, नयन कपिलकुमार मगरे, रुचिता जैन यांचा गुणपत्रक देण्यात आले. विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणारे व्ही.एम.पाटील, डी. एस. संदानशिव, प्रा. रुपेश नेवे यांचा माधुरी मयूर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. माधुरी मयूर यांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करून सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.