प्रताप विद्या मंदिरात गणित प्रगल्भीकरण कार्यशाळा

0

चोपडा । येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराचे यंदा शताब्दी महोत्सव वर्ष. शताब्दी महोत्सव वर्षानिमित्त शाळेत गणित प्रगल्भीकरण या तालुकास्तरीय दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या अध्यापक विद्यालयात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

गणिताची भीती दूर करणे गरजेचे
शिक्षकांमध्ये असणारी गणित विषयाबद्दलची भीती तसेच ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीत गणित विषयाचे अध्यापन करताना काय काळजी घेतली पाहिजे, येणारे युग हे गणित विषयाचे असल्याने त्यासाठी आतापासून पाऊले उचलने गरजेचे आहे. असे असे प्रतिपादन कार्यशाळेचे मार्गदर्शक प्रा.विपुला अभ्यंकर यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी केले गीत गायन
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव माधुरी मयूर होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेच्या सचिव माधुरी मयूर व प्रा.विपुला अभ्यंकर यांनी दीपप्रज्वलन व सरस्वतीपूजन केले. यावेळी विद्यार्थ्या गीत गायन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश संदानशिव यांनी केले. यावेळी तालुक्यातील विविध प्राथमिक शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक, पालक यांनी सहभाग घेतला.