हडपसर । संजय टकलेने मलेशियन राष्ट्रीय रॅली मालिकेतील तिसर्या फेरीत तंत्रज्ञान आणि प्रतिकूल हवामान असूनही पी-9 गटात तिसरा क्रमांक पटकाविला. एकूण क्रमवारीत तो सातवा आला. मलेशियातील रॅलीचा अनुभव आणि कारवरील नियंत्रणाचे कौशल्य पणास लावत त्याने यश मिळविले. संजयने सलग तिसर्या फेरीत करंडक जिंकला. पर्लीस प्रांतातील पहिल्या फेरीत त्याने गटात दुसरा क्रमांक मिळविला होता. त्यानंतर एपीआरसी मालिकेचा भाग असलेल्या जोहोर बारू येथील दुसर्या फेरीत तो एकूण क्रमवारीत दुसरा आला होता.
एमआरयु मोटारस्पोर्ट संघाकडून मी 2008 मध्ये खरेदी केलेली प्रोटॉन सेट्रीया कार आता तंत्रण्यानाच्या बाबतीत जुनी झाली आहे. त्यातच कार्बोरेटर बिघडल्यामुळे इंजिनला इंधन व्यवस्थित मिळत नव्हते. इंधन कमी पडल्यामुळे इंजिनाची पॉवर जाणवत नव्हती आणि वेग वाढविण्यात अडचणी येत होत्या. गटातील इतर कारमध्ये डायरेक्ट फ्युएल इंजेक्टर पध्द्तीचे तंत्रज्ञान होते. त्यामुळे त्या कार वेगवान होत्या. प्रतिकूल परिस्थिती असूनही संजयने हार मानली नाही. मलेशियात रॅलीचा प्रदीर्घ अनुभव असल्यामुळे त्याने सरस डावपेचांचा अवलंब केला.
निकाल : पी9 गट 1)महंमद खैरूल निजाम याकूब-शाहरुल झैनाल (प्रोटॉन- सेट्रिया -1:49:4:9), 2)अझुल अझर-नोर्बोकारी-तेह इए सिंग (प्रोटॉन सेट्रिया -1:54:14.5), 3)संजय टकले-डियान सुकमावान (प्रोटॉन सेट्रिया -1:57:31:3)