शहादा । घरची गरिबीची परीस्थिती असतांना प्रतिकूल परीस्थिती वर मात करून देवेंद्र संजय पाटील याने 10वीच्या परीक्षेत 94.00टक्के गुण मिळवून, आई-वडीलांना व शाळेतील शिक्षकांना आपल्या अथक प्रयत्नाने अचंबित केले आहे. शहादा तालुक्यातील वैजाली येथिल संजय वेडू पाटील यांचा मुलगा देवेंद्र हा शहादा येथील शेठ व्हि.के.शहा या माध्यमिक विद्यालयात इ.10वीत होता. तो रोज वैजाली ते शहादा बसने जा-ये करायचा घरची परीस्थिती जेमतेम.
पित्याची छाती अभिमानाने फुगवली
वडीलांची शेती नाहि, नोकरी नाही. होती ती पण विनाअनुदानित शाळेत शिपाईची .वडीलांना आई-वडील नसल्याने सर्व घराचा संसाराचा गाडा ते हात कामावरच ओढायचे.मुलाचे 10 वीचे वर्ष कसे करायचे सतत याच विवंचनेत असायचे. म्हणतात ना की जिसका कोई नहि उसका खुदा होता है. या प्रमाणे देवेंद्र ने 10वी च्या परीक्षेत 94 टक्के गुण मिळवून वडीलांची छाती अभिमानाने फुगवली आहे.
सराव प्रश्नपत्रिका सोडविण्यावर जास्त भर दिला
मुलांना सगळया सुखसोयी असून देखील जे शक्य होत नाही ते माञ देवेंद्रने परीस्थिती वर मात करून घवघवित यश संपादन करून प्रतिकूल परिस्थितीतील विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरला आहे. त्याच्या या यशामुळे आई-वडीलांचा आनंद गगनात भिडला आहे. त्यानी मुलाचे पेढे खाऊ घालुन तोंड भरून कौतुक कले .देवेंद्र ला शाळेचे जावरे, सतिषसर यांचे मार्गदर्शन लागले. त्याने सराव प्रश्नपत्रिका सोडविण्यावर जास्त भर दिला होता.